पोस्ट्स

सुखाची निंद

सुखाची निंद तीचा जन्म झाला अन् ती आईच्या प्रेमास मुकली कशीबशी बेवड्या बापाने तिला लहानाची मोठी केली.. काही दिवसांनी तीचा तो बापही मरुन गेला आईबापाविना पोरीचा जीव एकाकी पडला असच कुणी एका पुरुषाची नजर तिच्यावरुनी फिरली लाजुनी गोरी मोरी ती ही मग त्याच्या प्रेमात पडली तो ही अखेर पुरुषच होता त्याने तिचा विश्वास तोडला तिच्या भावनांचा सौदा करुन प्रेमाचा बाजार त्याने मांडला... कित्येक रात्री तेव्हापासुन ती स्वतःला सजवत होती प्रत्येक पुरुषापुढे स्वतःचे ती अंग झिजवित होती एके दिवशी ती देवाशी खूप खूप भांडली का रे माझ्या आयुष्याची तु अशी कहाणी रचली आता तरी मला ह्या  पापातुन मुक्त होऊ दे सोड तुझ्या जटेतली गंगा तिच्यात मजला न्हाऊ दे अचानक मग आकाशात विजांचा कडकडाट झाला जोरदार मुसळधार पावसाच्या सरी वेगात बरसल्या क्षणातच सार काही मग होत्याचं नव्हत झालं काळोख अन् वादळाच्या विळख्याने सारं गिळंकृत केल आज मात्र ती आनंदात न्हाली देवाशी थोडा संवाद करु लागली, म्हणे देवा आज मी खरी धन्य झाले  गंगेच्या पाण्याने मी पापमुक्त झाले आता म्हणे देवा तु मला आसरा दे तुझ्या कुशीत शांत निंद येऊ दे अलगद डोळे मिटून ...

रांगोळी

इमेज
                          रांगोळी                              माझे हे टुमदार अंगण बाई      पाणी शेणाने सारवल सकाळी त्यावर उठुन दिसे मांगल्याची      शुभ्र स्फटिक अशी रांगोळी...        "रांगोळी" हा शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी मांगल्य, चैतन्य, पावित्र्य अन समाधान आपल्या पुढे उभं रहात..घरापुढे अंगणात रोज रांगोळी काढली जाते. तसेच  प्रत्येक सणावारास  पांढरी शुभ्र अन त्यावर अनेक वेगवेगळे रंगछटांनी निर्माण झालेली रांगोळी तर साक्षात 'सरस्वती' चे रुपच दिसते...पांढरे शुभ्र वस्र लेवलेली सरस्वती जणु भरजरी रंगीबेरंगी रत्नांनी, अलंकारांनी शोभली आहे असे दिसते...आपल्या भारतीय संस्कृतीत तर रांगोळीचे फार महत्त्व आहे...मला रांगोळी म्हटलं कि माझी आई आठवते.     ...

आई

येते ओल डोळ्यांत झाकून ठेवते जखम मी सहसा तुझ्याशिवाय व्यक्त होत नाही... होते कधी तरी दुःखी, ना खेद करत बसत समज आहे मजला तु समीप माझ्या नाही तु म्हणशील मजला कशी आली तुला समज काय सांगु आता मी परस्थितीस सामोरे जाई लाचार होऊनी जगणे मजला पसंत नाही बघ आले तरी असे दिवस मी निपचित पडून राही तुच होती हक्काची तुझी जागा कोण घेई सारे जीव लावी तरी तुझ्या तोडीस कुणी नाही असे एकटे रहाणे बरे वाटे न आता मजला  दुःख ही माझे हे कवितेतून वहात नाही कवितेस व्यक्त होतांना भरुन वाही डोळे तरी पोरके पणाचे भार हलके होत नाही चारी दिशांत आता बघ तुझेच भास होई आभासी जगामधूनी वाटते यावे परतुनी आई                    .....चैता.....

आदरणीय पप्पा(बाबा)

जागा सुनीच झाली होऊ कसे मी व्यक्त     पोरक्या झाल्या भिंती झाले सुनेच दार मिटल्या डोळ्यांत आज विचारांची परवण    दूर देशी गेला बाबा सारे घर पोरके करुन... सावरु कसे आता नाही मोठी एवढी मी    माय माझी रडते सांगा जोजवू कसे तीला मी माझे काळीज तुमच्या सावलीत उभे केले    चटक्या पासून त्यास वाचवू कसे आता मी... आहे द्विधा अवस्था माझ्या मनाची आज    मार्ग तुम्हीच दावा मजला स्वप्नांमधी येवूनी डोळ्यांत आसवांचे आज पूर लोटलेले     तुम्हांविना आता मजला माहेर पोरके झाले... मनात आज वाटे यावे परतुनी पुन्हा तुम्ही    तुम्हा विना आज आहे पोरकेच आम्ही बांधले गेले हात आज कोणत्या दगडाखाली    मुकेच शब्दही आज मनास बोचती आहे.... पाहुण्याच आहे आता तुमच्या लाडक्या लेकी    आठवांत दिसती बाबा ते दुःख अपार आहे आयुष्यांशी लागली स्पर्धा हार मान्य करते    जिंकण्याचे सारे मार्ग बंद झाले आहे.... येई परतुनी एकदा आधार मनास द्याया    तुमच्या नसण्याची जाणीव बोचते आहे...             ...

त्याग

काय मिळविले जन्मास येऊनी सारेच मातीमोल झाले... कुणी न आपले येथे दिसती सारे परकेच झाले.... नुसते जगणे जगते आहे ना काही मागणे करते... प्रत्येक जणासाठी जगूनही माझ अस्तित्व मी कुठे टिकवते... दुःखाचे डोंगर पोखरुन कधी सुखाचा खजिना मिळतो... क्षणात मिळतो तो मजला अखेर अस्तित्व माझे मिटवतो... नको वाटते असले जगणे माफी सार्यांची मागते.... माझे हे सारे आयुष्य मी आता त्यागात समर्पित करते.... ....चैताली विभुते....

दुरावा सोड ना

नकळत आले समीप तुझा सहवास हवा होता आपुल्या प्रेमाचा बंध मी अलगद जपला होता का कळेना असे कोणते वादळ आले प्रेमावर तुझे बोलणेही सुटले मग शब्दतेच्या ओठांवर किती आठवणी त्या डोळ्यासमोरी तरळतात दुराव्याचं कारण काय सारख्या मजला पुसतात सारे कसे ओळखीचे झाले होते बघ आपुल्यात का आणला दुरावा असा तु आपुल्या प्रेमळ नात्यात विश्वास असावा नात्यांत खोटा नको बहाणा करु प्रेमाचा कोणता पुरावा सांग आता तुज पुढे धरु काय नेमके घडले आहे मजला काही तरी सांगावे जर आला असेल कंटाळा तर खरे तरी आता वदावे असे दुराव्याचे वागणे तुझे मला जरा खटकत आहे तु करतोस टाळाटाळ मज स्पष्टपणे कळत आहे तोडून जातील असे पोकळ नाते कधीही नसावे आयुष्यभराच्या साथीचे वचन तरी मग का द्यावे सोड ना दुरावा मला तुझ्या समीपच येऊ वाटे तुझ्या समीप नसतांना डोळ्यांत अश्रुंच दाटे वचनास तोडून तु नको मजपासुनी दुर जाऊ प्रेमाचा अंत करु नको सांग मी मजला कैसे साहु          .....चैता.....