आई

येते ओल डोळ्यांत झाकून ठेवते जखम
मी सहसा तुझ्याशिवाय व्यक्त होत नाही...

होते कधी तरी दुःखी, ना खेद करत बसत
समज आहे मजला तु समीप माझ्या नाही

तु म्हणशील मजला कशी आली तुला समज
काय सांगु आता मी परस्थितीस सामोरे जाई

लाचार होऊनी जगणे मजला पसंत नाही बघ
आले तरी असे दिवस मी निपचित पडून राही

तुच होती हक्काची तुझी जागा कोण घेई
सारे जीव लावी तरी तुझ्या तोडीस कुणी नाही

असे एकटे रहाणे बरे वाटे न आता मजला 
दुःख ही माझे हे कवितेतून वहात नाही

कवितेस व्यक्त होतांना भरुन वाही डोळे
तरी पोरके पणाचे भार हलके होत नाही

चारी दिशांत आता बघ तुझेच भास होई
आभासी जगामधूनी वाटते यावे परतुनी आई
 
                 .....चैता.....











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रांगोळी

सुखाची निंद

आदरणीय पप्पा(बाबा)