दुरावा सोड ना
नकळत आले समीप तुझा सहवास हवा होता
आपुल्या प्रेमाचा बंध मी अलगद जपला होता
आपुल्या प्रेमाचा बंध मी अलगद जपला होता
का कळेना असे कोणते वादळ आले प्रेमावर
तुझे बोलणेही सुटले मग शब्दतेच्या ओठांवर
तुझे बोलणेही सुटले मग शब्दतेच्या ओठांवर
किती आठवणी त्या डोळ्यासमोरी तरळतात
दुराव्याचं कारण काय सारख्या मजला पुसतात
दुराव्याचं कारण काय सारख्या मजला पुसतात
सारे कसे ओळखीचे झाले होते बघ आपुल्यात
का आणला दुरावा असा तु आपुल्या प्रेमळ नात्यात
का आणला दुरावा असा तु आपुल्या प्रेमळ नात्यात
विश्वास असावा नात्यांत खोटा नको बहाणा करु
प्रेमाचा कोणता पुरावा सांग आता तुज पुढे धरु
प्रेमाचा कोणता पुरावा सांग आता तुज पुढे धरु
काय नेमके घडले आहे मजला काही तरी सांगावे
जर आला असेल कंटाळा तर खरे तरी आता वदावे
जर आला असेल कंटाळा तर खरे तरी आता वदावे
असे दुराव्याचे वागणे तुझे मला जरा खटकत आहे
तु करतोस टाळाटाळ मज स्पष्टपणे कळत आहे
तु करतोस टाळाटाळ मज स्पष्टपणे कळत आहे
तोडून जातील असे पोकळ नाते कधीही नसावे
आयुष्यभराच्या साथीचे वचन तरी मग का द्यावे
आयुष्यभराच्या साथीचे वचन तरी मग का द्यावे
सोड ना दुरावा मला तुझ्या समीपच येऊ वाटे
तुझ्या समीप नसतांना डोळ्यांत अश्रुंच दाटे
तुझ्या समीप नसतांना डोळ्यांत अश्रुंच दाटे
वचनास तोडून तु नको मजपासुनी दुर जाऊ
प्रेमाचा अंत करु नको सांग मी मजला कैसे साहु
प्रेमाचा अंत करु नको सांग मी मजला कैसे साहु
.....चैता.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा