सुखाची निंद
तीचा जन्म झाला अन् ती
आईच्या प्रेमास मुकली
कशीबशी बेवड्या बापाने
तिला लहानाची मोठी केली..
काही दिवसांनी तीचा तो
बापही मरुन गेला
आईबापाविना पोरीचा
जीव एकाकी पडला
असच कुणी एका पुरुषाची
नजर तिच्यावरुनी फिरली
लाजुनी गोरी मोरी ती ही
मग त्याच्या प्रेमात पडली
तो ही अखेर पुरुषच होता
त्याने तिचा विश्वास तोडला
तिच्या भावनांचा सौदा करुन
प्रेमाचा बाजार त्याने मांडला...
कित्येक रात्री तेव्हापासुन ती
स्वतःला सजवत होती
प्रत्येक पुरुषापुढे स्वतःचे
ती अंग झिजवित होती
एके दिवशी ती देवाशी
खूप खूप भांडली
का रे माझ्या आयुष्याची
तु अशी कहाणी रचली
आता तरी मला ह्या
पापातुन मुक्त होऊ दे
सोड तुझ्या जटेतली गंगा
तिच्यात मजला न्हाऊ दे
अचानक मग आकाशात
विजांचा कडकडाट झाला
जोरदार मुसळधार पावसाच्या
सरी वेगात बरसल्या
क्षणातच सार काही मग
होत्याचं नव्हत झालं
काळोख अन् वादळाच्या
विळख्याने सारं गिळंकृत केल
आज मात्र ती आनंदात न्हाली
देवाशी थोडा संवाद करु लागली,
म्हणे देवा आज मी खरी धन्य झाले
गंगेच्या पाण्याने मी पापमुक्त झाले
आता म्हणे देवा तु मला आसरा दे
तुझ्या कुशीत शांत निंद येऊ दे
अलगद डोळे मिटून तेव्हा ती
अनंतात विलीन झाली होती
कित्येक रात्री अश्याच सजुन
नटून, जागुन काढत होती,
आज खरी सुखाने सजुन ती
अगदी शांत शांत निजली होती...
.....चैता.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा